रजि. नं. - जी. बी. बी. एस. डी. ३०९ / २०२१ मुंबई, महाराष्ट्र राज्य

कार्यकारी मंडळ


मुख्य कार्यकारीणी पदाधिकारी

(२०२२ ते २०२५ )

श्री. सुभाष सुरेश तांबे

गाव - निवोशी

अध्यक्ष

श्री. सत्यवान मांडवकर

गाव - सडवली

उपाध्यक्ष

श्री. सुजय गितये

गाव - कळसवली

उपाध्यक्ष

श्री. गणेश खानविलकर

गाव - गोळवशी

उपाध्यक्ष

सौ. पल्लवी नवरे

गाव - सोलगाव

उपाध्यक्ष

श्री. अजय मांडवकर

गाव - वडदहसोळ

मुख्य सचिव

श्री. बलराम तांबे

गाव - निवोशी

सहसचिव

श्री. महादेव हातणकर

गाव - वडदहसोळ

सहसचिव

कु. विनीत म्हादये

गाव - वडदहसोळ

सहसचिव

श्री. प्रकाश भगते

गाव - इंदवटी

खजिनदार

श्री. स्वप्नील मिरजोळकर

गाव - वडदहसोळ

सहखजिनदार

श्री. राजेश राघव

गाव - चुनाकोळवण

हिशोब तपासणीस

श्री. तानाजी तळेकर

गाव - कळसवली

मुख्य संघटक

श्री. दत्ताराम आगरे

गाव - रावारी

लांजा तालुका - संपर्क प्रमुख

श्री. रवींद्र गितये

गाव - वडदहसोळ

राजापूर तालुका - संपर्क प्रमुख

श्री. रविंद्र मटकर

गाव - चुनाकोळवण

सल्लागार

श्री. विजय भगते

गाव - इंदवटी

सल्लागार

श्री. अमोल पळसमकर

गाव - वडदहसोळ

सल्लागार

श्री. महेश मांडवकर

गाव - सडवली

सल्लागार

श्री. अनंत जाधव

गाव - शिवणे बु.

सल्लागार

श्री. प्रवीण फाटक

गाव - शेढे

सल्लागार

श्री. संदिप कांबळे

गाव - सडवली

कार्यकारीणी सदस्य

श्री. विलास शेडेकर

गाव - कळसवली

कार्यकारीणी सदस्य

श्री. प्रशांत जोगळे

गाव - वडदहसोळ

कार्यकारीणी सदस्य

कार्यकारणी संहरचना

कार्यकारणी पदभार व जबाबदाऱ्या

आपण आपल्यासाठी तयार केलेले नियम

दिनांक : १९ एप्रिल, २०२०

MPVS पदाधिकारी आणि सभासद,

  1. संघटना ही जात, पात, धर्म आणि पंथ हा भेदभाव मानत नसल्यामुळे संघटनेत कोणाचेही कोणत्याही धर्माबद्दल अनादर करणारे कृत्य वा विचार नसावेत. सदरप्रकरणांची चौकशी करून निर्णय घेण्यात येईल.
  2. संघटना राजकारणविरहित आणि सर्व चांगल्या घटकांना ( शासन, प्रशासन आणि सामान्य जनता) घेऊन काम करत असल्यामुळे वैयक्तिक टीकात्मक टिप्पणी करणे हे संघटनेच्या धोरणांच्याविरुद्ध असेल. सदर बाबतीत दोषी असणाऱ्यांवर तात्काळ विचार करुन निर्णय घेण्यात येईल
  3. एकजुटीचा विचार करून प्रत्येकाने आदर्शवत संघटना आणि संघटनेच्या कामाला प्राधान्य ध्यावे. काम हीच आपली ओळख आहे हे प्रत्येकाने आपल्या कामाने सिद्ध करावे. फक्त नाममात्र पदाधिकाऱ्यांवर योग्य वेळी विचार करुन दुसऱ्यांना संधी दिली जाईल.
  4. पदाधिकाऱ्यांचे एकमेकांशी तसेच एकमेकांविषयीचे बोलणे आदरात्मक असावे. सदर बाबतीत कोणाचीही तक्रार आल्यास (पुराव्यासह) त्यापदाधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील निर्णय घेण्यात येतील.
  5. संघटनेत प्रत्येक पदाधिकाऱ्यांना इतर पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या पदानुसार मानसन्मान दिला जावा. समोरून तितक्याच अदबीने धन्यवाद करत त्याचा स्वीकार करणे बंधनकारक असेल.
  6. एखाद्या पदाधिकाऱ्याने आपल्याला फोन केल्यास आपण त्यांना जसे आणि जेव्हा शक्य होईल तसे उत्तर देणे / विषयांची विचारणा करणे गरजेचे आहे. वारंवार फोन करूनही एखादा पदाधिकारी उत्तर देत नसल्यास तो समोरच्या पदाधिकाऱ्याचा आदर करत नाही, असे गृहीत धरून त्याच्यावर वेळीच आणि योग्य ती कारवाई केली जाईल.
  7. पदाधिकाऱ्यांबद्दल जाणून बुजून गैरसमज पसरवणे वा चुकीची अथवा उपहासात्मक टीका करणे, याबाबींवर गंभीरपणे विचार करून निर्णय घेतला जाईल. याबाबतीत कोणाचीही हयगय केली जाणार नाही.
  8. अंतर्गत संघटनेतील शिस्त आणि सुसूत्रता राखण्यासाठी Whatsapp ग्रुपवर अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सचिव हे नियमानुसार ग्रुप ऍडमिन राहतील. मात्र ग्रुप अंतर्गत अधिकार हे त्याग्रुप प्रमुखाना दिलेले असतील. सदस्याने नियमाचे उल्लंघन केल्यास त्यावर शिस्त भंगाची कारवाई केली जाईल.
  9. एका पदाधिकाऱ्याने कोणत्याही पदाधिकाऱ्याला चूक दाखवताना ती सूचनात्मक असावी. मग अशा वेळी सुरुवातीला फोनवर बोलून सदर चूक सुधारावी वा अपेक्षित बदल व्हावा याकडे पदाधिकाऱ्याचा कल असावा जेणे करून संस्थेच्या प्रगतीसाठी लाभदायक असेल. सदर बाबींचे पालन न करणाऱ्यांवर चौकशी करून आवश्यक निर्णय घेण्यात येईल.
  10. कोणत्याही प्रकाराबद्दल किंवा एकंदरीत आपल्या शंका-कुशंका यांवर आपल्या वरिष्ठांनी समाधान न केल्यास अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव यातीन पैकी एकापदाधिकाऱ्याकडे आपले मत नोंदवल्यावर सदर पदाधिकारी हा इतर दोन पदाधिकाऱ्यांशी बोलून त्यावर स्पष्टीकरण देईल आणि विषय संपुष्टात येईल.( संवाद केल्याने बोलण्याचा नेमका उद्देश लक्षात येईल तसेच नकारात्मकतेने विचार न करता त्याचा सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून पाहावे) तरीही समाधान न झाल्यास सदर आक्षेपा बाबत पदाधिकारी लेखी स्वरूपात कोणत्याही सचिवांकडे सदर निवेदन सादर करेल. सदर विषय सचिव अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या सहमतीने पुढील सर्वसाधारण सभे पुढे ठेवतील.
  11. संघटनेची गोपनीय माहिती (प्रचार प्रसार व्यतिरिक्त) बाहेर कोण सांगत व देत असेल तर कारवाई होईल.
  12. वैयक्तिक(पर्सनल) विषय ,परिवारातील विषय संघटनेत आणू नये व घेऊ नये असे केले तर त्यावर निर्णय घेतला जाईल.
  13. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वेळवेगळे उपक्रम स्वतःहून पुढाकार घेणे हे संघटनेसाठी हिताचे आहे. पण एखाद्याचा कोणत्याही उपक्रमामध्ये व संघटनेच्या कामात सहभाग नसेल तर त्यावर विचार करून निर्णय घेण्यात येईल.
  14. प्रमुख पदाधिकारी ( मुख्य कार्यकारीणी आणि कार्यकारी सदस्य ) राजकीयपक्षांचे काम करत असताना संघटनेच्या नावाला आणि कामाला धोका निर्माण झाल्यास वेळीच कारवाई केली जाईल.
  15. कोणत्याही पदाधिकारी वा सभासदाची कोणत्याही प्रकारची असभ्य, गैरव्यवहार व गैरवर्तणूक दिसल्यास कारवाई होईल.

सामाजिक कार्यकर्ता कसा असावा

    1. संस्थेचे ध्येय व उद्दिष्टे पूर्ण करण्याकरिता काम करणारा असावा.
    2. संस्थेच्या प्रत्येक सभासदाबद्दल त्याच्या मनात आपुलकी, प्रेम, सदभावना, आदरभाव असावा.
    3. काम कितीही मोठे आणि कितीही लहान असो ते आनंदाने पूर्ण करणारा व पूर्ण करून घेणारा असावा.
    4. शिस्त व वेळ पाळणारा असावा.
    5. सभासदाला अहंभाव नसावा. दुसऱ्या सभासदांचा व त्याच्या कामाचा सन्मान/आदर करणारा असावा.
    6. पदलोभी नसावा – पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते.
    7. आकलनशक्ती – पदाधिकाऱ्याच्या ‘सूचक’ शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. उच्चदर्जाची आकलन क्षमता असावी.
    8. सूक्ष्मनिरीक्षण – सभासदास सूक्ष्मनिरिक्षणशक्ति असावी.
    9. भाषण व संभाषण चातुर्य- आपल्या मधुरवाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य अवगत करावे.
    10. निराश मनोवृत्ती असणारा नसावा. तर अपयशाचे यशात रूपांतर करणारा असावा.
    11. ध्येय गाठण्यासाठी परिश्रम, चिकाटी आणि सातत्य तसेच नम्रता असणारा असावा.
    12. सभासद जोडणारा असावा. तोडणारा नसावा.
    13. कार्यकर्ते हे रणाराव व्यक्ती परीक्षक कर्तृत्वशाली, सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य असणारा असावा.
    14. कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा. इतरांचं लक्षपूर्वक ऐकून घेणे आणि त्यानुसार काम करणारा अभ्यासक असावा.
    15. प्रसिद्धी व प्रतिष्ठायांसह पापलेला नसावा. तसेच श्रद्धाळू असावा पण अंधश्रद्धाळू नसावा.
    16. उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करणारा असावा.
    17. चूक झाली असल्यास त्या कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन त्याची चूक कशी सुधारता येईल याबाबत मार्गदर्शन करणारा असावा
    18. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजनाची क्षमता असावी, संस्थेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारणारा असावा. किंवा किमान संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा.
    19. समताप्रेमी व समर्पितमनोवृत्तीचा असावा. श्रमाची लाज वाटणारा नसावा.
    20. संघटनेच्या हिता करिता काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा.
    21. संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य आणि पैसा हे ‘पंचदान’ देणारा असावा.

     

  • ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात; त्या संघटनेला जगात तोड नसते. आपल्यालाही आपलं संघटन मजबूत बनवायचं असेल तर वरील गुणधर्म सभासद म्हणून अंगी असणे अत्यावश्यक आहे. आपण सर्वानी मिळून एक उत्कृष्ट सामाजिक संस्था तयार करण्याची शपथ आज घेवूया.

 

 

    आपले नम्र,

श्री. विजय भगते

अध्यक्ष : मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापूर)