कु. सत्यजित खानविलकर
गाव : वैभववाडी, तालुका : कणकवली
माझा एल्गार
” आम्हाला उपकार नकोत, हक्काच्या सुविधा हव्यात”
असा खणखणीत आवाज या आपल्या संस्थेच्या मार्फत आपण शासन दरबारी नेहमीच पोहचवत आलो आहे.
वरवर पाहता ही समस्या तुम्हाला फार मोठी नाहीच वाटणार परंतु त्या समस्येचा उलगडा केला तर अस दिसून येत की शहरापासून बऱ्याच अंतर कापून डोंगरदऱ्या मधून बांधवांना रुग्णालयापर्यंत यायला पायपीट करावी लागते, मग ती गरोदर महिला असो वा साप चावलेला एखादा व्यक्ती. मोबाईल रेंजमध्ये आल्यावर सरकारची रुग्णवाहिका तातडीने येते हा बदलही सकारात्मक आहे. पण, गाव मात्र अजूनही विकासाच्या रेंजमध्ये नाहीत आणि शेवटी एवढी पायपीट करून तालुक्याच्या ठिकाणी आल्यावर अर्थात अनेकदा ‘पेशंटला सिव्हिलमध्ये घेऊन जा किव्हा पुढे रत्नागिरी, मुंबईला घेऊन जा !’ आमच्या कडे पुरेशी क्षमता नाही अशी स्थानिक यंत्रणेकडून सांगितले जाते, अशी तक्रार आहेच.
ग्रामीण रुग्णालयाबाबत आपुलकी निर्माण करण्यात अजून खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. यातील संवादाच्या काही समस्या सोडविण्यासाठी दुर्गम भागात काम करणारी MPVS सारखी सामाजिक संस्था जिल्ह्यात काम करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येवो अथवा न येवो काम करत राहण्याने त्यांनी ग्रामीण समाजात विश्वास निर्माण केलाय हे निश्चित.
आपल्या MPVS संस्थेने या समस्येवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी एक समिती गठन केली त्यांनी या समस्येवर बारकाईने लक्ष ठेवले अगदी स्वच्छतेपासून ते इमारतीच्या डागडुजी पर्यंत चा आढावा घेतला आपली आरोग्य यंत्रणा एवढी कुचकामी आहे फक्त साधन सामग्री आणि सुविधा या पेवरवर दिसून येतात प्रत्यक्षात केव्हा मिळणार आहे हे अद्याप स्वप्नवतच आहे.
रुग्णाला शहरात अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागू नये यासाठी येथेच नियोजन करून किमान लहान शस्त्रक्रिया करता येतील एवढी सुविधा मिळणे हा तर आमचा हक्कच आहे दुःख म्हणजे मलेरिया टायफॉईड सारख्या आजारावरच्या उपचारांची त्रुटी दिसते. माझा तुमच्या मार्फत एकच सवाल या सरकारी यंत्रणेला ,”का हो आमचा खरच किमान मूलभूत गरजा मिळाव्यात एवढा देखील अधिकार नाहीय का”?
कुठलीही आपत्ती ही नुकसानदायी असते हे खरे; पण ती पुढील वाटचालीसाठी धडा घालून देणारीही असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य सुविधांचा आढावा घेता ज्या उणिवा आढळून आल्या त्या पाहता, या आपत्तीनेही यंत्रणांना सुधारण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचे म्हणता येईल एवढे जरी समजून पुढे भविष्यात आमच्या लांजा राजापूर या तालुक्यात तरी आरोग्य सुविधांची कमतरता भासणार नाही एवढी आशा करतो.
धन्यवाद,
सत्यजित खानविलकर, वैभववाडी
Сайт “Дачный участок”
Получите бесплатную юридическую консультацию прямо в Telegram. Переходите по запросу бесплатная консультация адвоката по телефону круглосуточно в Telegram – Юрист поможет разобраться в проблеме, разъяснит возможные варианты действий и подскажет, какие документы могут потребоваться. Консультация доступна дистанционно, без визита в офис.
Получите бесплатную юридическую консультацию прямо в Telegram. Переходите по запросу чат бот бесплатной консультации юриста 24 часа – Юрист поможет разобраться в проблеме, разъяснит возможные варианты действий и подскажет, какие документы могут потребоваться. Консультация доступна дистанционно, без визита в офис.
Какие работы надо сделать в саду и огороде в октябре. Лунный посевной календарь на октябрь